Type Here to Get Search Results !

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पालम येथे भाजपा पार्टी मंडळ कार्यकारणीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन****...

 



मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पालम येथे भाजपा पार्टी मंडळ कार्यकारणीच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन....

     परभणी /वार्ता ..... महाराष्ट्र राज्यांचे  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पालम येथे भारतीय जनता पार्टी पालम मंडळ कार्यकारणी च्या वतीने दिनांक 22 जुलै2025 रोजी महाराष्ट्राचे लाडके कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पालम शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते .तसेच त्या सोबतच पालम शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण, गोमाता पुजन,कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.

               भारतीय जनता पार्टीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. आणि या कार्यक्रमात सर्व पदाधिकाऱ्यांनी व पालम मंडळातील जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान शिबिरात भाग घेऊन जास्तीत जास्त संख्येने रक्तदान केलेले पाहावयास मिळाले .

              त्यामध्ये प्रमुख उपस्थिती भारतीय जनता पार्टी माजी जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ मुरकुटे उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविले सर्व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाला च्यालना देऊन रक्त दान करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.

             भारतीय जनता पार्टीच्या पालम जनसंपर्क कार्यालय गंगाखेड रोड पालम, या ठिकाणी सकाळी 10 वाजता रक्तदान व वृक्षारोपण कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते .


                 या कार्यक्रमात प्रमुख पदाधिकारी भाजपा मंडळ् अध्यक्ष मल्लिकार्जुन लांडगे मंडळ पालम तालुकाध्यक्ष प्रदेश कार्यकारणी सदस्य आदरणीय लक्ष्मणराव रोकडे, कैलास रुद्रवार नगरसेवक,उपाध्यक्ष मधुकर रोकडे रमेश राठोड सुरेश तुडमे, करंजे सुधाकर, रघुनाथ दुधाटे ,( पालम तालुका महामंत्री रामेश्वर सुरनर ), कवडे अनंता, शहराध्यक्ष पांडुरंग रोकडे, युवा मोर्चा अध्यक्ष शिवानंद गव्हाणे, सोशल मीडिया पालम तालुकाध्यक्ष राम गावंडे किसान आघाडी भास्कर कराळे हनुमान देशमुख, निवृती रेड्डी या सह तालुक्यातील असंख्य कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या