देगलूर (प्रतिनिधी):
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील बेम्बरा येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. गावातील रहिवासी श्री. बालाजी वाडीकर यांच्या कौलारू घराला अचानक आग लागल्याने घराचे आणि जीवनावशक वस्तूचे मोठे नुकसान झाले आहे. या आगीत वाडीकर यांचे राहते घर जळाल्याने कुटुंब उघड्यावर आले आहे.
घटनेचा तपशील:
मिळालेल्या माहितीनुसार, ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. वाडीकर यांचे घर कौलारू असल्याने आगीने पाहता पाहता रौद्र रूप धारण केले. शॉर्ट सर्किट मुळे कपडे पेट घेतल्यामुळे आगीची तीव्रता अधिकच वाढली. आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
नुकसानीचे स्वरूप:
कौलारू घर: आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्यामुळे घराचे छप्पर (कौले) आणि लाकडी बांधकाम पूर्णपणे जळून खाक झाले आहे. घरातील जीवनावश्यक वस्तूंचेही नुकसान झाले आहे.
धान्य साठा नुकसान:
वर्षभरासाठी जमा करून ठेवलेल्या सर्व धान्य डाळी ज्वारी ,गहू, पीठ ,कपडे, पलंग, गाधी, कपडे या सर्व जिवाणवश्यक वस्तू , जीवनभराची कमाई आगीमध्ये जळून भस्म झाल्या आहेत त्यामुळे जगावे कसा हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
ग्रामस्थांची मदत:
आग लागल्याचे समजताच बेम्बरा येथील तरुणांनी आणि ग्रामस्थांनी धाव घेऊन पाणी टाकून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. ग्रामस्थांच्या तत्परतेमुळे आग अधिक पसरण्यापासून रोखण्यात यश आले, मात्र तोपर्यंत वाडीकर यांच्या घराचे अतोनात नुकसान झाले होते.
शासनाकडे मदतीची मागणी:
बालाजी वाडीकर हे अल्पभूधारक शेतकरी असून, या आगीमुळे त्यांचे राहते घर हिरावले गेले आहे. महसूल विभागाने आणि तहसील प्रशासनाने तातडीने या घटनेचा 'स्पॉट पंचनामा' करून वाडीकर कुटुंबाला शासनाकडून भरीव आर्थिक मदत मिळवून द्यावी, अशी मागणी बेम्बरा ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे....
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या