*"*(परभणी वार्ता / श्री रामेश्वर सुरनर)
*पालम येथील खोरस शिवारातील शेतकरी पिराजी लिंगराम राऊत वय (65) वर्ष राहणार खोरस आज दिनांक 30 जून 2025 सोमवार रोजी दुपारी त्यांच्या स्वतःच्या शेतामध्ये बैल चारत असताना अचानकपणे रानडुकराने हल्ला चढविला त्यामुळे शेतकरी पिराजी लिंगराम राऊत हे गंभीररित्या जखमी झाले असताना शेजारीतील शेतकऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन त्या शेतकऱ्यांना पालम येथील ग्रामीण रुग्णालय ऍडमिट करण्यात आले परंतु पालम येथील ग्रामीण रुग्णालय डॉक्टर साहेबांनी नांदेड येथे हलविण्यास सांगितले सध्या तो शेतकरी नांदेड येथील विष्णुपरी सरकारी दवाखान्यात अति दक्षता विभाग (आय सी यु) मध्ये दाखल करण्यात आले असून त्या शेतकऱ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे....

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या