Type Here to Get Search Results !

वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी हैराण.....

 


नांदेड वार्ता / दिपक पाटील .

                   देगलूर तालुक्यातील बेंबरा या गावांमध्ये वन्य प्राण्यांच्या त्रासाला कंटाळून शेतकरी हैराण झाल्याचे पहावयास मिळत आहे नैसर्गिक आपत्ती सोबत अनैसर्गिक आपत्ती ज्यामध्ये रान डुक्कर हरीण या वन्य प्राण्यांच्या उपद्रव्यमुळे शेतीत पेरलेले पीक नाहीसे करून टाकल्यामुळे शेतकऱ्या वरती उपास मारीचे वेळ आली आहे. तसेच त्यांच्या भ्याड हल्ल्यांमध्ये शेतकऱ्यांनी जखमी झाल्याचे पहावयास मिळत आहेत. 

बेंबरा या गावातील शिवारामध्ये एका एका शेतात 100ते 200 हरणांचा कळप पेरलेले बियाणे सुद्धा उकरून खाऊन शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट आणत आहेत. याकडे वन विभागाचे दुर्लक्ष झालेले आहे.असे पाहावयास मिळत आहे तसेच शासन स्तरावरून झालेल्या नुकसानी  बाबत कुठलीच मदत मिळत नाही त्यामुळे शेतकरी नैसर्गिक आपत्ती आणि अनैसर्गिक आपत्तीमुळे जीवनमरणाचा प्रश्न उद्भवला आहे.

 अडचणीच्या काळात पैसे जमा करून पेरणी केली असता .हरणांच्या कळपाने हजारो एकर क्षेत्रावरील सोयाबीन , तूर, मूग, उडीद, व कापूस या पिकाचे अतोनात नुकसान करत आहेत. त्यामुळे शेतकरी मदत मागावी तर कुणाला अशा अवस्थेमध्ये हतबल होऊन कपाळाला हात लावून बसण्याची वेळ शेतकऱ्यावर येऊन बसली आहे. त्यामुळे शेतकरी याबाबत शासन स्तरावरून उपाययोजना करून शेतकऱ्यांना या संकटातून वाचवण्याची विनंती प्रशासनास करत आहेत. प्रशासन याबाबतीत कुठलीच मदत करत नसल्यामुळे शेतकरी वर्गात नाराजी पसरलेली पहावयास मिळत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या