Type Here to Get Search Results !

फी'साठी मुजोर संस्थाचालकानं केलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं परभणी हादरले.....

 

परभणी / वार्ता...


                                   राज्यात आजही अनेक शैक्षणिक संस्थाचालकांकडून पालकांचा छळ सुरु असल्याचे प्रकार घडत आहेत. विद्यार्थ्यांची टीसी मागितली तर उर्वरीत फी भरेपर्यंत टीसी दिली जात नाही. त्यात मग दादागिरी केली जाते ,मारहाण होते. असाच प्रकार परभणीत (Parbhani) घडला आहे. एक वारकरी संप्रदायाचा पालक आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेले यावेळी उर्वरित फीससाठी चक्क संस्थाचालकाने पालकाला एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

फी साठी संस्थाचालकाची मुजोरी थेट पालकाच्या जीवावर उठली आहे. संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत पालकाचा जीव गेला आहे. याप्रकरणी संस्थाचालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाणून घेऊयात संपूर्ण प्रकरण. 

नेमका कसा घडला प्रकार?

परभणीच्या उखळद गावातील पल्लवी जगन्नाथ हेंडगे या विद्यार्थिनीचा प्रवेश अवघ्या काही दिवसांपूर्वी पूर्णा तालुक्यातील हट्टा येथे असलेल्या हायटेक निवासी शाळेत तिचे वडील जगन्नाथ हेंडगे यांनी तिसरीत केला होता. मात्र तिथे काही दिवस राहिल्यानंतर मला इथे नको म्हणत गावातील शाळेतच टाका असा तगादा तीन वर्षीय मुलीने पालकांकडे लावला होता. त्यावरून तिचे वडील जगन्नाथ हेंडगे हे आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी हायटेक शाळेत गेले असता तिथेच त्यांचा घात झाला. संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण यांना हेंडगे यांनी प्रवेश घेताना दिलेले पैसे मागितले. यावेळी चव्हाण यांनीही हेंडगे यांना तुम्हीच उर्वरित फी द्या अशी मागणी केली .यातूनच वाद झाला अन् संस्थाचालक असलेल्या प्रभाकर चव्हाण आणि त्यांच्या पत्नीने जगन्नाथ हेंडगे यांना बेदम मारहाण केली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला आह..


मुजोर संस्थाचालकावर कडक कारवाई करण्यात यावी .'फी'साठी मुजोर संस्थाचालकानं केलेल्या मारहाणीत पालकाचा मृत्यू, धक्कादायक घटनेनं परभणी हादरलं ........

आपल्या मुलीची टीसी काढण्यासाठी शाळेत गेलेल्या पालकाला फीससाठी चक्क संस्थाचालकाने एवढी मारहाण केली की त्यात या पालकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली .

फी साठी संस्थाचालकाची मुजोरी थेट पालकाच्या जीवावर उठली आहे. संस्थाचालकाने केलेल्या मारहाणीत पालकाचा जीव गेला आहे. याप्रकरणी संस्थाचालकावर परभणीच्या पूर्णा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या