प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
न्यायालयाच्या ऑनलाईन सुनावणीसाठी मार्गदर्शक तत्वे आणि नियमांचे पालन होणे आवश्यक आहे अन्यथा न्यायालयीन कारवाईला समोर जावे लागते. न्यायालयाच्या ऑनलाइन सुनावणी न्यायालयाने काही आवश्यक नियम व न्यायालयीन तत्वे आखून दिलेली आहे या तत्त्वाचे पालन होणे आवश्यक आहे अन्यथा न्यायालय दंड व शिक्षा ठोठावू शकते. गुजरात उच्च न्यायालयाने एका सुनामी दरम्यान एका व्यक्तीला न्यायालयाच्या ऑनलाइन नियम व तत्वाचे पालन न केल्यामुळे दोन लाख रुपये दंड ठोठावला.
गुजरात उच्च न्यायालयात एका व्हर्च्युअल सुनावणी दरम्यान घडलेला अजब प्रकार सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे या व्हिडिओमध्ये एक जण, न्यायालयीन कार्यवाही दरम्यान थेट टॉयलेट सीटवर बसलेला दिसत आहे आणखीन एक धक्कादायक म्हणजे तो त्यावेळी स्वतःला साफ करतानाही कॅमेरात कैद झाला ही घटना २० जून रोजी न्यायमूर्ती निझार एस देसाई यांच्या खंडपीठांसमोर घडली. कोर्टाच्या नोंदीनुसार संबंधित व्यक्ती हा एका एफ आय आर रद्द करण्याच्या प्रकरणात तक्रारदार होता दोन्ही पक्षांमध्ये आपसी समेट झाल्याने न्यायालयाने एफ आय आर रद्द करण्याचे आदेश दिले. प्रकरणातील प्रतिस्पर्धी प्रतिवादी म्हणून वर्चुअल सुनावणीत तो सहभागी झाला होता पहिल्यांदा १७ फेब्रुवारी २०२५ रोजी तो झुंबर लॉगिन झाला परंतु तो टायलेट मधून असल्याचे लक्षात आले प्रशासनाने त्याचा व्हिडिओ कापला. दुसऱ्यांदा त्याने पुन्हा तोच नंबर वापरून लॉगिन केले परंतु पुन्हा त्याची व्हिडिओ लिंक कापण्यात आली.
या प्रकरणात न्यायालयीन नियम व मार्गदर्शक तत्वाचे पालन न झाल्याने न्यायालयाने चिंता व्यक्त करत संबंधित व्यक्तीवर दोन लाख रुपयाचा दंड ठोठावला व दररोज आठ तास कोर्टाच्या भागांमध्ये स्वच्छता व पाणी पुरवठा करण्याची शिक्षा सुनावली. कोर्टाचे मरणे होते की जर अशा प्रकारे व्यक्तीवर कठोर कारवाई केली नाही तर न्यायव्यवस्थेची गरिमा जनतेसमोर कमी होईल न्यायमूर्ती एम के ठक्कर यांनी न्यायालय हे सिनेमागृह नाही अशी प्रतिक्रिया दिली होती ऑनलाईन माध्यमातून चालणाऱ्या न्यायालयीन कार्यवा कार्यवाहीतही शिस्तीचे पालन अत्यावश्यक आहे न्यायालयात हजेरी लावणे म्हणजे एक गंभीर जबाबदारी आहे ऑनलाइनचा अर्थ घरगुती वातावरणात काहीही करता येते अशा गैरसमज अनेकदा अशा घटनांमुळे समोर येतो अशा कृतींमुळे केवळ संबंधित व्यक्तीची नव्हे तर संपूर्ण न्यायव्यवस्थेची शिस्तता जोडीला मिळते.
गुजरात उच्च न्यायालयात ऑनलाइन सुनावणी दरम्यान होणारे अशोभनीय प्रकार याआधीही घडले आहेत. एप्रिल २०२५ मध्ये विश्वा वर्षांनी नावाच्या व्यक्तीला वर्चुअल सुनावणीत सिगारेट ओढण्यासाठी ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता फेब्रुवारी २०२५ मध्ये वामदेव गाढवी नावाच्या दुसऱ्या व्यक्तीने पलंगावर झोपून सुनावणीत भाग घेतला होता त्यालाही २५००० रुपये दंड थोठवण्यात आला होता
न्यायालयाच्या ऑनलाईन सुनावणीसाठी मार्गदर्शक तत्वे आणि नियम खालीलप्रमाणे आहेत:
१)तांत्रिक तयारी:
चांगल्या इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह एक शांत आणि व्यवस्थित जागा निवडा.
वेब कॅमेरा, हेडफोन आणि मायक्रोफोनची तपासणी करा.
तुमच्या डिव्हाइसमध्ये आवश्यक सॉफ्टवेअर आणि ॲप्स (जैसे, Zoom, Google Meet) असल्याची खात्री करा.
सुनावणी दरम्यान:
२)वेळेवर उपस्थित राहा.
शांत आणि व्यवस्थितपणे बोला.
आवश्यकतेनुसार आपले मत मांडा.
इतरांचे बोलणे शांतपणे ऐका.
अनावश्यक आवाज किंवा व्यत्यय टाळा.
न्यायालयाच्या सूचनांचे पालन करा.
३)आवश्यक कागदपत्रे:
तुमच्या प्रकरणाशी संबंधित सर्व आवश्यक कागदपत्रे (उदा. प्रतिज्ञापत्र, पुरावे) तयार ठेवा.
आवश्यक असल्यास, ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्यासाठी स्कॅन करून ठेवा.
४)गोपनीयतेचे पालन:
सुनावणी दरम्यान कोणतीही गोपनीय माहिती उघड करू नका.
तुमची ओळख आणि तपशील सुरक्षित ठेवा.
तुमची सुनावणी रेकॉर्ड करू नका किंवा प्रसारित करू नका.
५) इतर:
तुमच्या वकिलांशी संपर्क साधा आणि त्यांचे मार्गदर्शन घ्या.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तयार रहा.
कोणत्याही शंका असल्यास, न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधा.
६)मार्गदर्शक तत्त्वे:
प्रत्येक न्यायालयाचे स्वतःचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे असू शकतात.
टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या