नांदेड/वार्ता***
श्री.गजानन टेकाळे
नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यामध्ये आज रोजी पत्रकार संरक्षण समिती च्या मार्फत पत्रकार संरक्षण समिती संपर्क कार्यालय देगलूर येथे देगलूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक मारुती मुंडे साहेब यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ आणि प्रमाणपत्र व नियुक्तीपत्र देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला.
यावेळी भाजप शहराध्यक्ष प्रशांत दासरवाड उपस्थित होते तसेच देगलूर टाइम्स न्यूज चैनल चे मुख्य संपादक गजानन टेकाळे साहेब आणि इतर मान्यवर यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला. नवनियुक्त पदाधिकाऱ्याच्या नियुक्ती बद्दल सर्व समाजातून आनंद व्यक्त केला जात असून ,त्यांना पुढील वाटचालीस सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या