उदगीर तालुक्यातील नागलगाव येथे श्रीमती रुक्मिणी माता सुडे कन्या विद्यालय नागलगाव. तालुका .उदगीर, जिल्हा लातूर या शाळेमध्ये श्रीमती कमलबाई अण्णाराव वाडीकर यांना आज दिनांक 30 /6 /2025 वार सोमवार या दिवशी सेवापूर्ती सत्कार करा समारंभ कार्यक्रम आयोजित करून या कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेच्या मुख्याध्यापका सौ सुडे मॅडम यांनी सेविका श्रीमती कमलबाई अण्णाराव वाडीकर यांना सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अर्धवाड मॅडम यांनी केले आणि या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री शेरे सर यांनी केले तसेच या कार्यक्रमाला उपस्थित खड्डे सर ,काळगे मॅडम, मोरखंडे मॅडम ,वाडीकर मॅडम, वाडीकर सर, तसेच सेविका रसिका जाधव ,शालुबाई भाटकुळे, मामा गुंडरे मामा उपस्थित होते.
तसेच या सत्कार सोहळ्यास शाळेतील सर्व विद्यार्थी व गावातील सर्व लहान थोर मंडळी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढविले. श्रीमती कमलबाई वाडेकर यांनी अविरत वयाच्या साठ वर्षापर्यंत शालेय कामकाजात अविरत उत्कृष्ट सेवा पार पाडून निवृत्त होणाऱ्या कमलबाई आणणारा वाडीकर यांना सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.त्यांना या सोहळ्यानिमित्त सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन व कौतुक होत आहे तसेच पुढील कार्यास व पुढील नवीन आयुष्याच्या वाटचालीस भरभरून शुभेच्छा देण्यात आल्या....


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या