Type Here to Get Search Results !

नांदेड शहरातील भाग्यनगर कॉर्नर जवळ भीषण अपघात घडला***....

 नांदेड शहरातील भाग्यनगर कॉर्नरजवळ मंगळवारी (29 जुलै) दुपारी सुमारे 1:15वाजता एक भीषण अपघात घडला.



 नांदेड./ वार्ता....

                   आज भरदुपारी वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर मद्यधुंद अवस्थेतील फोर्ड एंडेवर गाडीच्या चालकाने एकामागून एक उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.

भरदुपारी वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर मद्यधुंद अवस्थेतील फोर्ड एंडेवर गाडीच्या चालकाने एकामागून एक उभ्या असलेल्या वाहनांना जोरदार धडक दिली.

या अपघातात बुलेट व रिक्षाचालक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातग्रस्त वाहन MH22 AM 0005 क्रमांकाची फोर्ड एंडेवर असून ती अतिशय भरधाव वेगात भाग्यनगर कॉर्नरच्या दिशेने येत होती.

भरधाव वेगाने येत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन ऑटो रिक्षा, एक मारुती अल्टो, एक रॉयल एनफिल्ड बुलेट आणि इतर काही दुचाकींना जबर धडक दिली.

या अपघातात बुलेट चालक एका ऑटो रिक्षा चालकाची अवस्था गंभीर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे...

नांदेड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या