राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.
राज्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थिती नियंत्रणासाठी सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे तसेच जीवितहानी, पशूधन आणि घरांच्या नुकसानीसाठी तातडीने मदतीसाठी अधिकारी, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले आहेत. शेतीच्या नुकसानीचेही तातडीने #पंचनामे करावेत आणि एनडीआरएफच्या निकषांप्रमाणे भरपाई देण्याबाबत कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत.
राज्यातील सुमारे १२ ते १४ लाख एकरवरील पिकांना फटका बसल्याची माहिती प्रथमदर्शनी हाती आली आहे. अद्याप पावसाचा जोर ओसरला नाही. त्यामुळे एनडीआरएफ, एसडीआरएफ तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या विविध यंत्रणांना सतर्क राहून समन्वयाने काम करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. वेधशाळांकडून मिळणाऱ्या माहितीच्या अनुषंगाने राज्यातील नागरिकांना पावसाबाबत दर तीन तासांनी सतर्कतेचे (अलर्ट) देण्यात येत आहेत. विविध प्रकल्पातून होणारा विसर्ग यावर संनियंत्रण केले जात असून यासाठी शेजारच्या राज्यातील प्रकल्पांबाबतही पाण्याच्या विसर्गाबाबत समन्वय राखला जात आहे.
अतिवृष्टीचा फटका मुंबई महानगराला सर्वाधिक बसला आहे. मुंबई महापालिकेच्या सर्वच यंत्रणांसह, राज्याच्या यंत्रणा समन्वयाने काम करत आहे. मुंबई शहर परिसरात खबरदारी म्हणून कार्यालयांनाही सुटी देण्यात आली. राज्यातील अनेक नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस आहे. त्यामुळे काही नद्या इशारा पातळीपर्यंत पोहचल्या आहेत. मुंबईत मात्र मिठी नदीने धोका पातळी ओलांडली. त्यामुळे सुमारे चारशे जणांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले, पण आता परिस्थिती नियंत्रणात आहे. मुंबई शहरातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून आहेत. त्यांनी मिठी नदी परिसरालाही भेट दिली आहे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी पत्रकारांना सांगितले

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या