Type Here to Get Search Results !

पालम - राणीसावरगाव रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य ......

 


परभणी/वार्ता    

दि. 3 रोजी पालम ते राणी सावरगाव राज्य रस्त्याचे काम गेल्या सहा महिन्यापासून सुरू आहे. मात्र आजपर्यंत एक किलोमीटरचा रस्ता सुद्धा पूर्णत्वास गेलेला नाही. रस्त्याच्या कामातील ढिसाळ नियोजन आणि गुत्तेदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य तयार झाले असून. त्यामळे लोकांच्या जीवाशी खेळण्याचा प्रताप गुत्तेदार करत आहेत, लोकांना रस्त्यावरून धरून प्रवास करावा लागत आहे, दररोज कमीत कमी दहा ते वीस मोटरसायकल रोडवर घसरून पडून अपघात होत आहेत त्यामुळे लोकांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.

सदरील गुत्तेदारास सर्व नागरिकांनी तोंडी 100 वेळा विनंती केली तरीही त्याच्या कामांमध्ये काही सुधारणा होताना दिसत नाही हा गुत्तेदार किती दिवस लोकांच्या जीविताशी खेळणार आहे हे लोकांना समजायला तयार नाही, असे जर चालले तर काहीतरी अघटित घडल्याशिवाय राहणार नाही,असे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे आहे परंतु गुत्तेदार काही लोकांचे म्हणणे ऐकून सुधारणा करण्यास तयार आहे असे वाटत नाही.

      यावर गुत्तेदाराने लवकरात लवकर काहीतरी उपाययोजना करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तालुका अध्यक्ष रामेश्वर सुरनर यांच्यावतीने रोडवर रास्ता रोको करून आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या