Type Here to Get Search Results !

सामान्यांना दिला जाणाऱ्या अन्नधान्याचा आणि शाळांमध्ये मध्यान्ह भोजनातील शिळ्या अन्नाचा प्रश्न अनेकदा समोर आला..तेव्हा कोणता लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला ....?

 संपादकीय......

प्रा डॉ सुधीर अग्रवाल .

                           निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये जोरदार राडा केला. निकृष्ट जेवणं दिल्याचा आरोप करत त्यांनी कॅन्टीनमध्ये कर्मचाऱ्याला मारहाण केली. शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याचा आरोप गायकवाड यांनी केला. त्यांनतर आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये झालेल्या मारहाणीच्या घटनेमुळे चर्चेला उधाण आलं आहे. या राड्यातून काही प्रश्न समोर आले आहेत. आमदार गायकवाड यांच्या जवळ सत्ता असल्याने त्यांनी हा प्रश्न समोर आणत हाणामारी केली.आमदार निवास भोजनात जर निकृष्ट दर्जाचे जेवण दिल्या जात असेल तर सामान्य जनतेच्या अन्नधान्याचे काय होत असेल...सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत गोर गरिबांन जे धान्य पुरविल्या जाते..ते उत्कृष्ट दर्जाचे असते का? अनेकदा कीड लागलेले अन्नधान्य वितरण केल्या जाते..शाळांमध्ये मध्यान्ह भोजनातील शिळ्या अन्नाचा प्रश्न अनेकदा समोर आला..तेव्हा कोणता  लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला?


भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक वितरण प्रणाली ही गरीब आणि दुर्बल घटकांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वाची यंत्रणा आहे. पाच लाखांहून अधिक रास्त भाव दुकानांद्वारे अन्नधान्याचे मोफत वितरण केले जात असले तरी, प्रणालीमध्ये अद्याप अनेक त्रुटी आहेत, ज्यामुळे देशाच्या अन्न धोरणावर विपरीत परिणाम होत आहे. इंडियन कौन्सिल फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स च्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की देशातील २८ टक्के अन्नधान्य अपेक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. या गळतीमुळे दरवर्षी २० दशलक्ष टन अन्नधान्य वाया जाते, ज्यामुळे सुमारे ६९,००० कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे सार्वजनिक वितरण प्रणालीत व्यापक सुधारणा करण्याची गरज आहे.मात्र 

यावर मात्र कोणताही आमदार व खासदार बोलायला तयार नाही.

सार्वजनिक वितरण प्रणालीतील  अन्नधान्य अनेकदा निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य आणि अन्नसुरक्षेवर परिणाम होतो. सार्वजनिक वितरण प्रणाली  ही सरकारची एक योजना आहे, ज्याद्वारे गरीब लोकांना कमी किमतीत अन्नधान्य मिळते. पण अनेकदा या योजनेत पुरवठा होणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असते, असे दिसून आले आहे


आमदारांना शीळ अन्न दिल्याने संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याचं दृश्य कुस्तीतील आराखड्यासारखे होते.त्यांनी काही एक विचार न करता टॉवेल व बनियान  वर येऊन एका पहिलवानासाखे येऊन कॅन्टीन कर्मचाऱ्यांना मारहाण करू लागले..याचे त्यांना काहीच वाटले नाही..आपण एक लोकप्रतिनिधी आहोत..आपली वागणूक सर्वसामान्य ठिकाणीच नव्हे तर सर्वत्र कशी असायला पाहिजे,याचा थोडा तरी विचार त्यांच्या मनात आला नाही..काही एक विचार न करता..ज्या स्थितीत ते होते त्याच स्थितीत येऊन त्यांनी फौजदारासारखी कर्मचाऱ्याला मारहाण केली. याचा व्हिडीओ देखील समोर आला.


जेवणाचा दर्जा चांगला नसल्याची संजय गायकवाड यांची प्रामुख्याने तक्रार होती. यासाठी चक्क डाळीची एक पिशवी घेऊनच संजय गायकवाड बनियन आणि टॉवेलवर कॅन्टिनमध्ये दाखल झाले आणि कर्मचाऱ्यांना जाब विचारू लागले. एका कर्मचाऱ्याशी बोलता बोलता त्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. संजय गायकवाड यांच्या या वर्तनासाठी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधकांनी अधिवेशनात केली.

दरम्यान, संजय गायकवाड यांच्यावरील कारवाईबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नसताना संबंधित कॅन्टिन चालकाचा परवाना मात्र रद्द करण्यात आला आहे. महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने कॅन्टिनचालकाचा परवाना रद्द करण्याचे आदेश बुधवारी दिले. संजय गायकवाड यांनी कॅन्टिनमध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे या अन्नाचे नमुने बुधवारी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.इतकी तत्परता सामान्यांच्या बाबतीत सरकार दाखवणार काय?


कॅन्टीनचा ठेका एकाच कंपनीकडे का? हा ही प्रश्न या अनुषंगाने उपस्थित होत आहे.आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनच्या मालकावर सरकार मेहरबान आहे का, असा प्रश्न देखील या  अनुषंगाने उपस्थित केला जात आहे. कारण अंजता कॅटर्स हे अनेक वर्षांपासून ते कॅन्टीन चालवत आहेत. मुदत संपल्यानंतर ही पाच वर्षांपासून हे कॅटर्स का सुरु आहे. त्यामुळे नियमांना बगल देत अनेक वर्षांपासून दक्षिण भारतीय असलेल्या कॅटर्सवर सरकार मेहरबान असल्याचं बोललं जात आहे.


या कॅन्टीनचं कंत्राट ‘अजंठा केटरर्स’ या कंपनीकडे असून ती गेल्या सात वर्षांपासून हे कॅन्टीन चालवत आहे. याच ठिकाणी कार्यरत असलेल्या योगेश पुर्तन या मॅनेजरला आमदार संजय गायकवाड यांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे. अजंठा केटरर्सचे मालक जयराम बी. शेट्टी हे मुंबईतील असून त्यांच्या ताब्यात इतरही शासकीय कॅन्टीन कंत्राटे आणि हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसाय आहेत. आकाशवाणी आमदार निवासाबरोबरच मनोरा आमदार निवासाचे कॅन्टीन कंत्राट देखील अजंठा केटरर्सकडे होतं. २०१८ मध्ये मूळ कंत्राटाची मुदत संपल्यानंतर दोनदा मुदतवाढ देण्यात आली होती, आणि त्यामुळेच अजंठा केटरर्स सातत्याने गेल्या सात वर्षांपासून कॅन्टीन चालवत आहे.


या कॅन्टीनमध्ये काम करणारे कर्मचारी हे काही दक्षिण भारतातून आलेले आहेत, तर काही महाराष्ट्रातील स्थानिक आहेत. यामधील योगेश पुर्तन हा मॅनेजर म्हणून काम पाहत होता. तो मूळचा दक्षिण भारतातील असून, घटनेनंतर त्याला आपल्या गावी पाठवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणी अजूनतरी कॅन्टीन मालकांकडून किंवा कर्मचाऱ्यांकडून आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील तपासाची दिशा काय असेल, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.. 


एका आमदाराला जर शीळ अन्न दिले  तर मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला. आता हाच प्रश्न सामान्य जनता  वितरण प्रणालीतील अन्नधान्याबाबत  उपस्थित करत आहे.मात्र या प्रश्नाचे उत्तर अनुत्तरित आहे.कारण सामान्य जनतेचा वाली कोण? सामान्य लोकांजवळ सत्ता, पैसा नाही..उलट प्रश्न उपस्थित करताच सामान्यांचा आवाज दाबल्या जातो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या