परभणी वार्ता ...
पालम तालुक्यातील खोरस गावातील कुठलाही राजकीय वारसा नसतानाही स्वकर्तुत्वावर आत्म निर्भर होऊन इतरांना प्रेरणा देणारा साधा सरळ सरळ सर्वांशी मनमिळावू असा सामाजिक कार्यकर्ता म्हणून ओळख असलेला आणि गोरगरिबांच्या सुखा दुःखा मध्ये नेहमी अग्रेसर असणारा श्री. रामेश्वर शिवाजी सुरनर (खोरसकर)यांची भारतीय जनता पार्टी पालम मंडळ कार्यकारणी मध्ये तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
आज हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे यांचे जनसंपर्क कार्यालय कोंद्री रोड गंगाखेड येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंद आदरणीय सुरेश भाऊ भुमरे ,आणि माजी जिल्हाध्यक्ष आदरणीय संतोष भाऊ मुरकुटे यांनी श्री.रामेश्वर सुरनर यांची तालुका सरचिटणीस पदी नियुक्ती करून त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यावेळी उपस्थित पालम तालुका उपाध्यक्ष मधुकर रोकडे, शहराध्यक्ष पांडुरंग रोकडे ,सोशल मीडिया पालम तालुका अध्यक्ष राम गावंडे, सोशल मीडिया, सरचिटणीस अनंत कवडे, सरचिटणीस भास्करराव दुधाटे चिटणीस रंगनाथ कल्याणकर, किसान मोर्चा भास्कर कराळे, युवा मोर्चा शिवानंद गव्हाणे, ओबीसी मोर्चा हरिश्चंद्र साबळे, अल्पसंख्यांक मोर्चा शेख अजगर, अनुसूचित जाती मोर्चा प्रेमानंद मस्के ,आदिवासी मोर्चा चंदू पवार, किसान मोर्चा भास्करराव कराळे ,कामगार आघाडी गोपीराज शिंदे विशाल जाधव ,
तसेच रामप्रभू मुंडे ,व्यंकटराव तांदळे, लिंबाजीराव टोले, विठ्ठलराव रबदडे, साहेबराव सुरनर महामंत्री भागवत बाजगीर पालम मंडळ अध्यक्ष मल्लिकार्जुन लांडगे व इतर भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे असंख्य पदावर अधिकारी व कार्यकर्ते आणि सर्व मित्र परिवार उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या