Type Here to Get Search Results !

बेंम्बरा गावामध्ये "ग्राम दरबार " कार्यक्रमाचे आयोजन ....****

 


देगलूर प्रतिनिधी....

                           देगलूर तालुक्यातील बेंम्बरा या गावात "ग्राम दरबार - एक दिवस गावकऱ्यांसोबत" उपक्रमांतर्गत विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात गावकऱ्यांशी थेट संवाद साधत शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

सर्वप्रथम सकाळी सर्व विभाग प्रमुख अधिकारी व कर्मचारी यांनी आरोग्य केंद्र तपासणी , अंगणवाडी केंद्र, शाळा ,ग्रामपंचायत कार्यालय येथे भेटी देऊन आरोग्य आणि पशूधन यांचे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात येऊन मार्गदर्शन करण्यात आले.

 सदरील  कार्यक्रमासाठी पंचायत समितीचे सहायक गट विकास अधिकारी कुरुंदे साहेब, विस्तार अधिकारी श्री उमाटे साहेब, कृषी विस्तार अधिकारी अंबुलगेकर साहेब, पशुवेद्यकीय अधिकारी दाडगे साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी किसवे साहेब, msrlm चे चव्हाण, लोडे साहेब, सरपंच भाग्यश्री शिवाजी गायकवाड, ग्राम पंचायत अधिकारी गडदे, तसेच माझी सरपंच भाऊराव होनमाने , तेजराव पाटील ज्ञानेश्वर झमकाडे, माधव  बोरुळे विठ्ठल वाघमोडे ,तानाजी बोरले ,एम एम ,गायकवाड शंकर कांबळे शिवाजी गायकवाड गावातील नागरिक व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

ग्राम दरबारात शिक्षण, आरोग्य, रोजगार, बचत गट, सामान्य प्रशासन व ग्रामपंचायत यांच्या योजनांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. संबंधित विभागांचे अधिकारी, ग्रामसेवक आणि कर्मचारी यांनी आपल्या-आपल्या विभागातील योजनांची माहिती दिली तसेच उपस्थित ग्रामस्थांच्या शंका आणि प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली.



कार्यक्रमादरम्यान महिला बचत गटांना प्रशिक्षण, स्वयरोजगार संधी, आरोग्य तपासणी, शैक्षणिक योजनांबाबत जनजागृती आणि ग्रामपंचायतीच्या कामकाजात पारदर्शकता या मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला.

गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभलेल्या या उपक्रमामुळे शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा अधिक मजबूत होईल, असे मत या वेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

विविध अधिकारी यांनी ग्राम दरबार कार्यक्रमात आपल्या विभागातील योजनांची माहिती दिली .कार्यक्रम यशस्विते करिता ग्राम पंचायत अधिकारी मा .श्री . गडदे साहेब यांनी परिश्रम घेतले. सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांच्या वतीने आभार मानण्यात आले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या