Type Here to Get Search Results !

पालम तालुक्यात दुर्दैवी घटना : शेतातून परतणारा युवक लेंडी नदीत वाहून गेला....

 पालम तालुक्यात दुर्दैवी घटना : शेतातून परतणारा युवक लेंडी नदीत वाहून गेला



पालम (दि. २९ ऑगस्ट) : तालुक्यातील मौजे खोरस येथील परमेश्वर साहेबराव खंडागळे (वय २५) हा युवक आज शेतातून घरी परतत असताना दुर्दैवाने लेंडी नदीत पाय घसरून वाहून गेला.



घटनेची माहिती मिळताच गावकरी व पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. मात्र अंधार दाटल्याने शोधकार्याला अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे सकाळी लवकर बोटीद्वारे शोधमोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.आशी माहिती गंगाखेड येथील उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांनी दिली आहे 


या घटनेमुळे खोरस गावात हळहळ व्यक्त केली जात असून परिसरात शोककळा पसरली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या