Type Here to Get Search Results !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ? राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात मागितली मुदतवाढ*

 *💁🏻‍♂️ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर ? राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात मागितली मुदतवाढ*



 नांदेड/ वार्ता...🔸 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. या निवडणुका पुढे ढकलण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल केला आहे. या अर्जामध्ये जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती करण्यात आली आहे. 

➖➖➖➖➖➖➖➖➖

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

🔸 यापूर्वी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला 4 आठवड्यांच्या आत निवडणुका जाहीर करण्याचे निर्देश दिले होते. या आधी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. अनेक महापालिकांमध्ये प्रभाग रचना जारी करण्यात आली होती, तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी आरक्षण सोडतही काढण्यात आली होती. 

🔸 मात्र याचिकाकर्त्यांचे वकील देवदत्त पालोदकर यांच्या मते प्रभाग रचना आणि आरक्षणासंदर्भात मुंबई व नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाल्यामुळेच निवडणूक आयोगाने ही मुदतवाढ मागितली आहे. जर कोर्टाने निवडणूक आयोगाचा अर्ज स्वीकारला तर निवडणुका लांबणीवर पडतील. मात्र जर कोर्टाने हा अर्ज फेटाळला तर निवडणूक आयोगाला पूर्वीच्या आदेशानुसार 4 आठवड्यांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करावा लागेल 

➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*📣 तुमची बातमी आणि  तुमच्या व्यवसायाची जाहिरात करण्यासाठी संपर्क 👉 9823752367 *

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या