देगलूर तालुक्यातील लोणी येथील देवस्थानची जमीन परस्पर फेरफार नोंद रद्द करण्याची मागणी करिता उपोषण ...
नांदेड /वार्ता... लोणी तालुका देगलूर येथील श्री मारोती देवस्थानची जमिन गट नंबर 3व 3/1 13 एकर 36 गुंठे जमिनीची रजिस्ट्रीव फेरफार नोंद रद्द करण्याच्या मागणीसाठी शिवसेनेचे आमरण उपोषण
1- मागण्या अनाधिकृत झालेले फेरफार रद्द करुन पुर्ववत देवस्थानच्या नावे करण्यात यावे
2, देवस्थान ची जमिन वर्ग 3 करण्यात यावी,
3 लोणी येथील मंडळ अधिकाऱ्यांमार्फत जमिनीचा पंचनामा करून जमिन शासनाच्या व मंदीर संस्थेच्या ताब्यात देण्यात यावे,
4 देवस्थानच्या जमीनीवर अतिक्रमण करून ताब्यात घेऊन आज पर्यंत घेतलेल्या उत्पन्नाचा मावेना वसुली करण्यात यावे,
5 देवस्थानच्या जमिनीवर उचलेलेल्या बॅकेच्या कर्जाची वसुली करण्यात यावी,
6 शासनाची फसवणूक करून जमीन ताब्यात घेतल्यामुळे संबंधीतावर 420 चा गुन्हा दाखल करण्यात यावे,
देवस्थानची जमीन इनामी असताना फसवणूक करुन वर्ग. 1 ची जमीन केलेल्या तलाठ्यास कार्यवाही करुन निलंबित करण्यात यावी या मागणीसाठी वारंवार निवेदने देऊन देखील प्रशासनाने दखल न घेतल्याने शेवटी शिवसेना उपतालुकाप्रमुख उपसरपंच मानाजी पाटील लोणे लोणीकर हे देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत यावेळी उपोषणस्थळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश पाटील, देगलूर शिवसेना शहर प्रमुख संजय जोशी, युवा सेना तालुका प्रमुख तथा शिवसेना सोशल नेटवर्कर प्रमुख भागवत पाटील सोमुरकर, शिंदे शिवसेना माजी तालुकाप्रमुख घाळप्पा अंबेसंगे शेळगावकर, भ्रष्टाचार निर्मूलन चे बालाजी पाटील लंगोटे वळगकर आदींनी भेट देऊन उपोषणाला पाठिंबा दिला आहे..


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या