लातूर/वार्ता...
उदगीर जळकोट तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नागरिकांचे, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरांची पडझड, गोठ्याचे नुकसान, शेतीपिकाचे नुकसान, जमिनी खरडून गेल्या आहे यासह खाजगी सार्वजनिक मालमत्तेचा नुकसान तसेच काही व्यक्ती मृत देखील पावले आहेत. या सर्व नुकसानग्रस्तांना अद्याप कितीही शासकीय मदत मिळाली नसून शेतकरी आणि नागरिक चिंतेत असून त्यांना आपण धीर देणं गरजेचं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना, नागरिकांना आणि बाधितांना तातडीने मदत मिळावी यासाठी राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
अतिवृष्टीमुळे उदगीर जळकोट तालुक्यातील मृत पावलेल्या व्यक्तींना अद्यापपर्यंत कसलीही मदत देण्यात आलेली नाही, मृत जानावरांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यामध्ये मोठी आणि लहान दुधाळ जनावरे, आंदा काम करणारी लहान जनावरे मृत पावली आहेत. अंशतः पडझड झालेल्या पक्क्या घरांचे, कच्च्या घरांचे व बाधित गोठयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उदगीर तालुक्यात सार्वजनिक व खाजगी मालमत्तेचे नुकसान झाले आहे तसेच निराधार कुटुंबांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. बागायत, जिरायत शेतीपिकाचे नुकसान बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यासह जमीन देखील खरडून गेल्या आहेत.
या सर्व बाबींचा सहानुभूतीपूर्वक विचार करुन उदगीर-जळकोट तालुक्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या हानीबाबत नुकसान भरपाई तात्काळ देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना उचित आदेश देण्याची आग्रही मागणी केली.

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या