जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव रोकडे व संजय साडेगांवकर पुन्हा भाजपात दाखल
परभणी,दि.25(प्रतिनिधी) : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेशराव रोकडे व संजय साडेगांवकर या दोघा नेतेमंडळींनी आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.
राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, जिल्ह्याच्या पालकमंत्री सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, ज्येष्ठ नेते माजी आमदार सुरेश वरपुडकर, जिल्हाध्यक्ष भुमरे, माजी जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, प्रभाकर वाघीकर, महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी बोरसे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुभाष कदम विठ्ठलराव रबदडे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पाथरी रस्त्यावरील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात रोकडे व साडेगांवकर यांनी पक्षप्रवेश करीत सर्वांना चकित केले.
गेल्या काही दिवसांपासून जिल्हा परिषद निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काही माजी सदस्यांनी भाजपात प्रवेश करीत स्थानिक पातळीवरील राजकीय समिकरणे बदलून टाकली आहेत.
श्री.रामेश्वर सुरनर पाटील...


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या