गंगाखेड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक – 2025 🏛️🗳️
परभणी./ वार्ता........
आज गंगाखेड येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षा पदाच्या अधिकृत उमेदवार सौ.जयश्री रामप्रभु मुंढे यांनी आज निवडणूक निर्णय अधिकारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.*
*यावेळी गंगाखेड शहरातील पत्रकार बांधव यांच्याशी संवाद साधला यामध्ये शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आगामी काळात ठोस पावले उचलण्याचा संकल्प रामप्रभु मुंढे यांनी व्यक्त केला. शहरातील मूलभूत सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी - स्वच्छ पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापनाची आधुनिक व्यवस्था, स्वच्छ व सुंदर शहर उपक्रम, रस्ते-विज सुविधा सुधारणा, तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी स्मार्ट सीसीटीव्ही प्रणालीचा विस्तार - यांसारख्या अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची अंमलबजावणी प्राधान्याने करण्याबाबत पत्रकार बांधवांशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली.*
*यासोबतच महिला स्वावलंबन, युवा कौशल्यविकास, ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य, लघु उद्योजकांना प्रोत्साहन आणि सामाजिक समन्वय वाढविण्यावर विशेष भर देत “गंगाखेडचा सर्वांगीण आणि नियोजित विकास हेच आमचे ध्येय आहे,” असा निर्धारही व्यक्त केला.*
यावेळी मा.आ.श्री.सिताराम घनदाट मामा, श्री.संतोषराव मुरकुटे मा.जिल्हाध्यक्ष परभणी, श्री.भरतराव घनदाट, श्रीनिवास मुंढे मा.सभापती परभणी, अँड.व्यंकटराव तांदळे, श्री.विठ्ठल मामा रबदडे, श्री.रणधीरराजे भालेराव, श्री.मदनजी शिंदे, श्री.महाविरराजे भालेराव, रवि जोशी आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या उत्साहात व मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*निवडणूक निशाणी : कमळ 🌷*

टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या