प्रतिनिधी
संपादक. श्री दिपक पाटील बेंम्बरेकर
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) पक्षाचे प्रमुख अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाला आहे. बारामती विमानतळावर उतरताना या विमानाला अपघात झाला असून अपघातात मा.श्री. अजित पवार यांच्यासह ६ जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान भीषण अपघात झाला. बारामती येथील गोजुबावी परिसरातील धावपट्टीवर उतरत असताना विमानाचे नियंत्रण सुटले आणि ते बाजूच्या शेतात कोसळले.
या अपघाताची तीव्रता खूप मोठी असल्याची माहिती समोर आली आहे.या अपघातात विमान जळून खाक झाला असून आज बाजू चा संपूर्ण परिसर जळून गेल्याचे पहावयास मिळते. पोलिस प्रशासनानं आणि आरोग्य विभागाने वेळीच दाखल घेऊन जखमींना उपचाराकरिता दाखल करण्यात आले असल्याचे सांगितले.या घटनेत मृतांचा आकडा वाढला जाण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
या भीषण घटनेत महाराष्ट्राचे कायम उप मुख्यमंत्री राहणारे मा.श्री अजित दादा पवार यांच्यासह विमानातील इतर ६ जणांचा मृत्यू झाला आहे. या मध्ये सुरक्षा रक्षक आणि स्विय सहाय्यक ( P.A) सोबत असल्याचे बोलले जात आहे पण त्यामध्ये कोण कोण आहेत ? हे अजून स्पष्ट झालेले नाही.
त्या सोबत इतर कोणी महत्त्वाचं व्यक्ती आहेत का? हे पाहणे तितकेच महत्वाचे आहे.आज महाराष्ट्र राज्य सरकार मधील राजकारणातील एक मोठा आणि अभ्यासू नेता चालता बोलता काळाच्या पडद्यामागे गेला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे." जिथे नियतीचा घाला येथे कोणाचेही चालेना " या उक्ति प्रमाणे आज पवार कुटुंबावर नियतीने हा प्रसंग ओढावला आहे.
आज सकाळी साडेनऊ वाजता च्या सुमारास मुंबईवरून विमान प्रवासातून मूळ गावी बारामती येथे जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रचार सभा करिता नियोजित दौरा पूर्ण करताना हा अपघात झाला असून त्यामुळे महाराष्ट्राचे कायम उप मुख्यमंत्री राहणारे मा. अजित दादा पवार साहेब यांचे दुर्दैवी मृत्यू झाल्याचे स्थानिक कार्यकर्त्यांनी आणि पक्ष कार्यालयांनी जाहीर केले आहे..........
“मी आतापर्यंत संयम पाळलाय… माझं काम बोलतं. १५ तारखेनंतर ते बोलणार नाहीत.” देवेंद्र फडणवीस
या घटनेनंतर सोशल मीडियावर या विधानाचा वेगवेगळ्या अर्थाने उल्लेख होत असून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. काहींनी हे विधान त्या काळातील राजकीय संघर्षाच्या संदर्भात पाहिले, तर काहींनी त्याचा आशय वेगळ्या पद्धतीने मांडला.
दरम्यान, या प्रसंगात राज्यभरातून नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांकडून शोक भावना व्यक्त होत असल्याचे चित्र आहे. अजित पवार यांच्या राजकीय वाटचालीवर आणि राज्यकार भारातील योगदाना वर चर्चा होत आहे. सर्वत्र त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे..


टिप्पणी पोस्ट करा
0 टिप्पण्या