Type Here to Get Search Results !

पुरुषोत्तम मासानिमित्त बेंबरा आणि हाळी ग्रामस्थांचे पंढरपूरकडे प्रस्थान! चंद्रभागा वारकरी प्रतिष्ठान बेंबरेकर यांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन; एस. टी. बस रवाना

 


बेंबरा/देगलूर (विशेष प्रतिनिधी):

                          पुरुषोत्तम मासाचे पावन पर्व साधून देगलूर तालुक्यातील बेंबरा आणि हाळी येथील ग्रामस्थांच्या वतीने तीर्थक्षेत्र पंढरपूर (शेगाव धुमाला) येथील 'चंद्रभागा वारकरी प्रतिष्ठान बेंबरेकर' या ठिकाणी भव्य अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. वैकुंठवासी ह.भ.प. धोंडोपंत दादासाहेब यांच्या कृपाशीर्वादाने आयोजित या सोहळ्यासाठी बुधवार, दिनांक २० मे रोजी संध्याकाळी ठीक ६:०० वाजता बेंबरा येथून वारकरी आणि भाविक भक्तांना घेऊन एस.टी. बस पंढरपूरकडे रवाना झाली आहे.

​                  प्रस्थान करण्यापूर्वी ग्रामस्थांच्या उपस्थितीत एस. टी. बसचे शास्त्रोक्त पूजन व नारळ फोडून विठ्ठल नामाच्या गजरात भाविकांना निरोप देण्यात आला. हा सप्ताह गुरुवार, दिनांक २१ मे २०२६ ते २८ मे २०२६ या कालावधीत संपन्न होणार आहे.

​                   या सप्ताहात दररोज पहाटे काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, तु.भ. गाथा भजन, प्रवचन आणि रात्री ९ ते ११ या वेळेत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची कीर्तने रंगणार आहेत. यामध्ये ह.भ.प. तुकाराम महाराज साबणे, भागवताचार्य त्र्यंबक महाराज लातूरकर, ह.भ.प. बाबुराव महाराज पाटील, ह.भ.प. गणपतराव महाराज देशमुख, ह.भ.प. रामचंद्र महाराज झामकाडे, ह.भ.प. दत्तात्रय महाराज पवार आणि ह.भ.प. अवधुत महाराज भारती यांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. गुरुवार २८ मे रोजी ह.भ.प. श्रावणराव महाराज शिंदे यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता होईल.

​                         हा सोहळा यशस्वी करण्यासाठी समस्त गावकडी मंडळी, बेंबरा व हाळी (ता. देगलूर) आणि चंद्रभागा वारकरी प्रतिष्ठानचे पदाधिकारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. सर्व भाविक भक्तांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या