Type Here to Get Search Results !

एव्हरेस्ट बेस कॅम्पवर संविधान आणि भगवद्गीता फडकावणारे बच्चू कडू पहिलेच लोकप्रतिनिधी

 


 नांदेड (प्रतिनिधी): 

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून माजी राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांनी जगातील सर्वोच्च शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टच्या 'बेस कॅम्प'वर तिरंगा फडकवून एक नवा इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे, अशा प्रकारे एव्हरेस्टवर संविधान घेऊन पोहोचणारे ते देशातील पहिलेच राजकारणी ठरले आहेत.

एका हातात 'संविधान' तर दुसऱ्या हातात 'गीता'

​                    डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी हा साहसी उपक्रम राबवला. ५,३६४ मीटर उंचीवर असलेल्या एव्हरेस्ट बेस कॅम्पवर पोहोचल्यानंतर बच्चू कडू यांनी एका हातात भारतीय संविधान आणि दुसऱ्या हातात श्रीमद्भगवद्गीता धरून मानवतेचा आणि समतेचा संदेश दिला. यावेळी त्यांनी अभिमानाने तिरंगा फडकवत महामानवांना मानवंदना वाहिली.

​                      या मोहिमेबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की, "डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे जगातील सर्वोत्तम मार्गदर्शक तत्व आहे. संविधानातील मूल्ये आणि गीतेतील कर्मयोग यांचा संगम घडावा, याच विचारातून हा प्रयत्न केला आहे." कडाक्याची थंडी आणि प्रतिकूल हवामानावर मात करत त्यांनी हे यश संपादन केले.

सर्वत्र कौतुकाचा वर्षाव

​                   एका लोकप्रतिनिधीने अशा प्रकारे धाडस दाखवत सामाजिक ऐक्याचा आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिल्याने संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. या मोहिमेमुळे युवकांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना दिलेली ही एक अनोखी आणि ऐतिहासिक श्रद्धांजली मानली जात आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या