Type Here to Get Search Results !

नांदेड पोलिसांचे 'ऑपरेशन क्रॅकडाऊन'; मुक्रामाबाद आणि इतवारा परिसरातून १८ लाखांचा गोवंश जप्त, ४ आरोपींवर गुन्हे दाखल!

 


नांदेड (विशेष प्रतिनिधी / दिपक पाटील बेंम्बरेकर):

                   नांदेडचे पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनव कुमार यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात राबविल्या जात असलेल्या 'ऑपरेशन क्रॅकडाऊन' अंतर्गत पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठी कारवाई केली आहे. बेकायदेशीर गोवंश बाळगणाऱ्या आणि त्याची वाहतूक करणाऱ्यांवर धाडी टाकून पोलिसांनी तब्बल १८ लाख १५ हजार रुपये किमतीचा गोवंश जप्त केला असून, एकूण ४ आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.



                 नांदेड शहर, इतवारा, देगलूर आणि बिलोली उपविभागामध्ये अवैध गोवंशाची तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी विशेष पथके स्थापन केली होती. या पथकांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही धडक कारवाई केली.

                      मरखेल पोलीस ठाण्याच्या पीएसआयची धडक कारवाई (४४ गोवंश जप्त) कारवाई १: 

                             मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मरखेल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री.विलास पवार  साहेब आणि त्यांच्या पथकाने (पथक क्रमांक ०२) मुक्रामाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे परतपूर (ता. मुखेड) शिवारात धाड टाकली. आरोपींच्या शेतात तब्बल ४४ अवैध गोवंश जातीचे जनावरे (०१ कारवड आणि ४३ गोरे) विना चारा-पाण्याची अत्यंत निर्दयतेने कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवल्याचे पथकाला आढळून आले. पोलिसांनी ११,८५,०००/- रुपये किमतीचा हा मुद्देमाल जप्त केला असून, मुक्रामाबाद पोलीस ठाण्यात खालील आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे:

१. रफिक गौससाब कुरेशी (वय ४५ वर्ष, रा. मुक्रामाबाद)

२. अमजद शिकुरसाब कुरेशी (वय ३२ वर्ष, रा. मुक्रामाबाद)

३. उस्मान शिकुरसाब कुरेशी (वय ३५ वर्ष, रा. मुक्रामाबाद)

                      कारवाई २: इतवारा पोलिसांची कारवाई                    (१८ गोवंश जप्त)

                        दुसऱ्या कारवाईत, पोलीस उपनिरीक्षक रमेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने (पथक क्रमांक ०१) इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहेमत नगर, मोहम्मदिया मशिदीजवळ एका बंद घरामध्ये धाड टाकली. तिथेही कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेले १८ गोवंश जनावरे मिळून आले. पोलिसांनी ६,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे:

१. गयुर कुरेशी शेख रहीम (वय ५२ वर्ष, रा. रहेमत नगर, इतवारा, नांदेड)



        एकूण १८ लाखांचा मुद्देमाल जप्त

                         दोन्ही कारवायांमध्ये मिळून पोलिसांनी एकूण १८,१५,०००/- रुपयांचा मुद्देमाल (गोवंश जनावरे) जप्त केला आहे. आरोपींविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

                     पोलीस अधीक्षक मा. श्री. अभिनव कुमार यांनी या धडक कामगिरीबद्दल दोन्ही पथकांतील अधिकारी आणि अंमलदारांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केलेl आहे.                     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या